अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- शिवसेनेच्या कोकणातील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार केली. मंगळवारी कोकणातील सेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पाच सेना आमदार हजर होते. मुख्यमंत्री सध्या शिवसेना आमदारांच्या विभागीय बैठका घेत आहेत. मंगळवारी कोकणची बैठक होती.
बैठकीला उदय सामंत, भरत गोगावले हे कोरोना संसर्गामुळे अनुपस्थित हाेते. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे गैरहजर होते. तर मंत्रिपद न मिळाल्याने नाराज भास्कर जाधव यांनी बैठकीला दांडी मारली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १६७ कोटी निधीची तरतूद होती. मात्र वित्त विभागाने तो दिला नाही, अशी तक्रार या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
जणांचा बळी गेल्याने बळींची एकूण संख्या ७०६ झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved