उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३ रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी

Published on -

१८ मार्च २०२५ मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन सदस्य पदावर नसल्याने त्या तीन सदस्यांचे रिक्त पद भरण्यासाठी लवकरात लवकर नियुक्ती करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून रिक्त सदस्यांच्या पदावर नव्या उमेदवारांची नियुक्ती लवकर झाली तर परीक्षा, मुलाखती, निकाल या सर्व प्रक्रिया गतिमान होतील आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

महाराष्ट्राच्या सेवेसाठी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण तरुणींना न्याय मिळेल,असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्राध्यापक अशा राज्य सेवेतील महत्त्वाच्या पदांसाठी नियुक्त्या केल्या जातात.

या प्रक्रियेसाठी आयोगात एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर झाली आहेत पण मंजूर झालेल्या पाच पदांपैकी सदस्यांची तीन पदे अजूनही रिक्तच आहेत.या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे म्हणून परीक्षांना उशीर लागत आहेत.मुलाखत,निकाल या प्रक्रियेला उशीर होत आहे.त्यामुळे ही पदे लगेचच भरण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन पवार यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News