अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : उपनगराध्यक्ष राऊत यांनी महापुरुषांचे नाव घेऊन आरोप केले, यात तथ्य नाही. त्यांना स्मारकच बांधायचे होते, तर त्यांनी दोन वर्षापूर्वी निधी मंजूर असताना का बांधले नाही. बाजारतळ येथे अनाधिकृत शॉपिंग गाळे बांधून किती बेरोजगारांना दिले?
अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जागा असताना का केले नाही. कापरेवाडी चौक सुशोभिकरण का केले नाही या प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यावे, असे आव्हान राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी दिले
कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करीत असून त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे प्रतिपादन कर्जत नगरपंचायतच्या विरोधी पक्षनेत्या पूजा संतोष मेहेत्रे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी नगरसेवक सचिन घुले, डॉ. संदीप बरबडे, ओंकार तोटे, संतोष मेहेत्रे उपस्थित होते. शुक्रवारी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांच्यावर
महापुरुषांच्या स्मारक निधी रस्ते आणि गटार कामासाठी वर्ग करीत त्यांचा अवमान केल्याचा आरोप केला होता. त्यास विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने शनिवारी प्रत्युत्तर दिले.
मेहत्रे म्हणाल्या, कर्जत शहरात मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. महापुरुषांच्या विचाराप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने आमदार पवार यांनी कर्जत नगरपंचायत हद्दीत ड्रेनेज लाईन, रस्ते, फिल्टर पाणी, स्वच्छतागृह कामे पूर्ण करण्यासाठी यापूर्वीच साडे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला.
अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अधिक साडेआठ कोटी रुपये अखर्चित निधी सुचवला. मात्र उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी महापुरुषाच्या नावाचा आधार घेत त्याच्या स्मारक कामात केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी कालची पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews