अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसामुळे धरणे, नद्या, बंधारे आदी ओव्हरफ्लो झाली होती. तसेच अनेक ठिकाणी तर पर्जन्य परिस्थिती उद्भवली होती.
पाण्याचा एवढा सुकाळ असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील काही गवई तहानलेलीच आहे. श्रीगोंदे तालुक्यातील ढोरजा येथील दलित वस्तीमध्ये दोन लाख रुपये खर्चून बांधलेली पाण्याची टाकी पूर्ण होऊन सुद्धा पाणी मिळत नसल्याने लोक पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
आठ दिवसांत पाणी योजना सुरू न झाल्यास महिलांचा हंडा मोर्चा काढणार, असा इशारा प्रमोद उजागरे, शरद रणसिंग, प्रसाद बोटे, विनोद उजागरे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ढोरजा ग्रामपंचायत यांनी दोन महिन्यापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीतून आम्हा दलित बांधवाना पाणी मिळत नसल्याबाबत निवेदन घेऊन गेलो असता,
ग्रामसेवक यांनी निवेदन न घेता आम्हाला आरेरेवीची भाषा वापरली व पाणी सोडणार नाही, काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. गावातील दलित वस्तीमध्ये सुमारे ३०० लोकवस्ती आहे.
त्यांची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाने २ महिन्यापूर्वी पाण्याची टाकी बांधली. काम सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले. पण टाकीत आजवर पाणी सोडण्यात आले नाही.
सध्या दलित वस्तीवर पाण्याची कोणतीही सोय नाही. या पाण्याच्या टाकीतून येत्या आठ दिवसांत पाणी सोडावे, अन्यथा महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved