अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- वेबसाईटद्वारे चालविण्यात येणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. इंटरनेटवरील विशिष्ट संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि मुलींच्या साह्यायाने वेश्याव्यवसाय चालवण्याचा उद्योग होता.
उच्चभ्रू समाजातील व्यक्तींना पंचतारांकित हॉटेलमध्ये या परदेशी मुली लाखो रुपयांच्या मोबदल्यात उपलब्ध करून दिल्या जात होत्या.दक्षिण मुंबईत परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि या परप्रांतीय मुलींच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा उलगडा झाला.
शनिवारी पहाटे एका हॉटेलवर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली. या प्रकरणी एका दलालाला अटक करण्यात आली असून बॉम्बे एस्कॉर्ट सर्व्हिस या वेबसाइटद्वारे गिऱ्हाईकांना ग्रॅण्ड रोड येथील एका हॉटेलमध्ये तरुणी पाठवित असे, असे पोलिसांनी सांगितले.
सोशल मीडियावरून आलेल्या जाहिरातीवर पोलिसांच्या एका विशेष पथकाने संबंधित मोबाइलवर संपर्क साधला. त्याबाबत तोतया ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली असता, महिला एजंटने त्यांना रक्कम घेऊन ग्रॅण्ट रोड येथील हॉटेलवर बोलाविले.
थोड्या वेळानंतर ती दोन तरुणींना घेऊन ती हॉटेलमध्ये पोहोचली. पोलिसांनी खातरजमा केली असता, वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. दोन्ही युवती परप्रांतीय असून, त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे.