अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-ब्राम्हण समाजाची लोकसंख्या हि अवघी २ % आहे. दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राम्हण समजातून येऊन सुद्धा महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.
या सगळ्याचे गुपित देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदे मध्ये सांगितले. या मध्ये त्यांनी आपला राजकारण मधील प्रवास तसेच गोष्टी कशा घडत गेल्या या बद्दल सविस्तर सांगितले.
जेव्हा जेव्हा देशाने आपलं पुरोगामीत्व गमावलं तेव्हा तेव्हा ते पुरोगामीत्व टिकवण्या साठी ब्राम्हण समाजातील लोक आघाडी वर राहिले.
तसेच त्यांनी ब्राम्हण चळवळ टिकवले असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी त्यांनी एक किस्सा सांगितला,
ते म्हणाले कि माझा एक मित्र मला म्हटला कि सध्या ला राजकारणा मध्ये जाती पातीचे प्रस्थ खूप वाढले आहे. २ % असून सुद्धा कसा तग धरला आहे हे कळत च नाही.
त्यावर देवेंद्रजीनी दिलेले उत्तरं अतिशय सोपं आहे ते म्हणजे जर २ % ब्राम्हण लोकांनी जर ९८% लोकांमध्ये मिसळून घेण्याची क्षमता दाखवली आणि
समाजपयोगी काम केली तर ते लोक आपल्याला डोक्यावर घेतात आणि आपल्याला पुढारपण देतात. मीही तेच केले आणि लोकांची सेवा केली असे त्यांनी सांगितले.