विठ्ठलाचा प्रसाद आता भाविकांना मिळणार घरपोच !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- कोरोना मुळे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येऊ शकत नाही. म्हणून मंदिर सेवा समितीने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. श्री विठ्ठलाचा प्रसाद आणि इतर वस्तू आता भाविकांच्या घरपोच मिळणार आहेत.

यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा समितीने एक संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून भाविकांना घरपोच प्रसाद पोहोचवण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

समितीने तयार केलेल्या संकेतस्थळाचे नाव पंढरी प्रसाद डॉट कॉम असे आहे. तसेच या संकेतस्थळाचा सुरुवात मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसकर आणि ज्योतिषाचार्य ह.भ.प. अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली.

भाविकांनी www.pandhariprasad.com या संकेतस्थळावरुन प्रसाद मागवण्यासाठी ऑर्डर करायची आहे. तसेच प्रसादाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. सेवा समिती प्रसाद कुरियरद्वारे भाविकांच्या घरपोच करणार आहे.

तसेच अन्य वस्तूही भाविक घरपोच मागवू शकतात. या सेवेद्वारे पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये लाडू, पेढय़ाच्या प्रसादासह कुंकू, बुक्का, तुळशीच्या माळा, अगरबत्ती, चंदनी खोड-सहाण, टाळ, श्री विठ्ठलाच्या सर्व प्रकारची मूर्ती, फोटोफ्रेम, सोवळे, उपरणे आदींचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24