अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बीड : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीतही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाने माजी मंत्री पंकजा मुंडेंना धक्का दिला.
त्यानंतर आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर धनंजय मुंडेंनी विजय मिळवला. भाजपची एक हाती सत्ता असलेल्या बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना जोरदार धक्का देत जिल्हयात वर्चस्व निर्माण केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने आपले अस्तित्व सिद्ध केल्यानंतर, आता पुन्हा सभापती पदावरही राष्ट्रवादीचे चार सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि सभापती पद एवढंच नाही तर जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात धनंजय पर्व दिसू लागलं आहे.