अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-कोरोना काळात राज्याच्या तिजोरीवर भर आला त्यामुळे नवीन विकासकामे चालू करताना पण सरकार हात आखडता घ्यायला लागलं .
पण मंत्र्यांच्या बंगले आणि दालनावर जवळपास ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं समोर आलय . यामध्येच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा उल्लेख आहे . त्यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे .
आपल्याला निवास्थानाचा ताबा मिळून ८ दिवसही झाले नसून तिथे आपण एक रुपयाही खर्च न केल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आल. याबाबत ट्विटर संदेशातून त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे . धनंजय मुंडे ट्विटरवर म्हणतात , काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या निवासस्थानावर खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येतय .
त्यात मला मिळालेल्या चित्रकूट निवासस्थानावर ३ कोटी ८९ लाख खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात आलं . मला सरकारी निवासस्थान मिळून ८ दिवसही झाले नसून अद्याप मी एक रुपयाही खर्च न केल्याचं त्यांनी म्हटल . राज्यभरात सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत केली जाणारी कामे थांबवलेल्या अवस्थेत आहेत .
त्यावर खर्च केला जाणारा निधी कंत्राटदारांना मिळताना दिसत नाही . पण याच्या अगदी विपरीत मंत्र्यांच्या दालनाची व बंगल्याची काम जोरात सुरु आहेत . त्या कामाची बिले तत्परतेने पास होऊन कंत्राटदारांना देयके दिली जात आहेत . मंत्र्यांच्या बंगल्याची कामे ९० % पूर्ण होऊन बाकी पूर्ण व्हायच्या मार्गावर आहेत .
एकीकडे राज्यात कोरोनाची झळ बसलेली असताना बंगल्यांच्या अथवा दालनाच्या कामांवर याचा कोणताही परिणाम झाल्याचं दिसून येत नाही . मिळालेल्या माहितीनुसार बंगले आणि दालनावर खर्च करण्यात आलेल्यांमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आलाय .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला (३ कोटी २६ लाख ), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी – १ कोटी ७८ लाख ), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन -२ कोटी २६ लाख ), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (मेघदूत – १ कोटी ४६ लाख), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे (चित्रकूट – ३ कोटी ८९ लाख ),
उद्योग मंत्री सुभाष देसाई (शिवनेरी १ कोटी ४४ लाख ),अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (रामटेक – १ कोटी ६७ लाख ), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री अमित देशमुख (बी ३ १ कोटी ४० लाख ), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (सातपुडा – १ कोटी ३३ लाख ), नितीन राऊत (पर्णकुटी – १ कोटी २२ लाख ) अस बंगल्यांवरील दुरुस्तीचा खर्च आहे .
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मलबार हिलवर दोन बंगले देण्यात आलेले आहेत . त्यांची नावे अनुक्रमे अग्रदूत व नंदनवन आहेत .त्यावरही जवळपास २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आलाय . बांगला दुरुस्तीच्या नावाखाली त्या ठिकाणी महागड्या वस्तूंचा (जसे कि इटालियन मार्बल ) वापर केला जातो .
बहुतेक बंगल्याना नव चकाचक केलं जात .बांगला दुरुस्ती करताना त्यात महागड्या वस्तूंचा वापर करावा असा दबाव मंत्र्यांचे पीए ,पीएस यांच्यामार्फत आणला जात असल्याचं बांधकाम अधिकाऱ्यांचा पूर्वानुभव आहे .दालनावरही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचं कळतंय .