अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष था ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले होते.
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनीही परळी शहरात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर चांगलाच गोंधळ उडाला.
मंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले. ८१ किलो वजनाचा केक खाण्यासाठी स्टेजवर एकच झुंबड उडाली. स्टेजवरील प्रमुख व्यक्तींनी केकचा तुकडा एकमेकांना भरविला.
या कार्यक्रमानंतर केक खाण्यासाठी प्रेक्षकातील तरुण, लहान मुलांनी स्टेजवर धाव घेतली. जास्तीत जास्त केक आपल्या हाती लागावा, यासाठी सर्वांची धडपड सुरु झाली.
त्यामुळे चेंगरा चेंगरी होऊ लागल्याने पोलिसांनी लाठीमार करीत सर्वांना स्टेजवरुन खाली उतरविले. या सर्व प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल आता चांगलाच व्हायरल होत आहे.