अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनकाच्या ‘कोविशिल्ड’ लसचा पुरवठा देशभरातील सुरू झाला आहे. कोविशिल्डची पहिली खेपही राजधानी दिल्ली तसेच मुंबईत पोहोचली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सरकारसाठी प्रति डोस २०० रुपये दर निश्चित केला आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात आजपासून कोरोना लसीकरण सुरु झालं. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे.
कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही आज लस टोचून घेतली आणि या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झाले. अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिलं आहे की, जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.
कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो.