मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले का? शरद पवार म्हणाले….

Maharashtra Politics : सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्याचा शिंदे यांनी इन्कार केला होता. आता पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. पत्रकारांनी पवार यांनी यासंबंधी प्रश्न विचारला, त्यावर पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला येऊन भेटलेले नाहीत.

व्हायरल झालेला तो फोटो जुना आहे. उगाच कोणाचीही बदनामी करणे योग्य नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे. याशिवाय पवार यांनी इतरही विषयांवर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत मध्यावधी निवडणुका होतील, असे पवार म्हणाल्याच्या बातम्या आल्या होत्या,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यावरही त्यांनी खुलासा केला आहे, ‘मध्यावधी निवडणुका लागतील असे मी बोललो नाही. निवडणुकांसाठी आपण तयार असले पाहिजे असे मी कार्यकर्त्यांना म्हणालो होतो’. ‘औरंगाबादच्या नामांतराबाबत सुसंवाद नव्हता, नामांतराचा निर्णय घेणार याबाबत माहिती नव्हती.

या विषयावर पाहिजे तशी चर्चा झाली नाही. औरंगाबादच्या नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देण्याची गरज होती. पण आम्ही मंत्रिमंडळाचा भाग होतो त्यामुळे तो निर्णय आमचाही आहेच.’ असेही पवार म्हणाले.

‘खरी शिवसेना कोणाची? हे उद्या कोर्टचं ठरवेल. कारण दोघेही म्हणतात शिवसेना माझीच. या प्रकरणातून मी एकदा गेलेलो आहे. आम्हाला भाजपची कोणतीही ऑफर नव्हती. ऑफर असण्याचे कारणच नव्हते. महाविकास आघाडी एकत्र लढावी अशी माझी इच्छा. पण अजूनही एकत्र लढण्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.’ असेही पवार म्हणाले.