अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, हा मुद्दा सध्या विविध पातळ्यांवर चर्चेत आहे.
हा मुद्दा आता केवळ शिक्षण क्षेत्र किंवा सरकार, पालक-विद्यार्थी यांच्यापुरता न राहाता लोकप्रतिनिधींकडेही याबद्दल पालक विचारणा करू लागले आहे. त्यामुळे याच्यावर आ.रोहित पवार यांनी टीका केली आहे.
ते म्हणतात ‘स्वत: ऑनलाइन बैठका घेता अन् मुलांना परीक्षा द्यायला लावता? ‘ हा कुठला न्याय आहे. आजच्या ह्या महामारीच्या परिस्थितीत आपण स्वतःच्या मुलाला बाहेर पाठवू शकतो का? याचा विचार यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी करावा.
व विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ‘परीक्षा’ या विषयाचा एकदाचा ‘निकाल’ लावावा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
यासंबंधी विद्यार्थी आणि पालक आपल्याकडे तीव्र भावना व्यक्त करू लागल्याचा उल्लेख पवार यांनी केला आहे. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) अद्यापही परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे यूजीसीच्या अधिकाऱ्यांना उद्देशून पवार यांनी ट्विट केले आहे.
राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा विषय संपला असे वाटून काही काळ चर्चा थांबली होती. मात्र, अलीकडेच यूजीसीने राज्यांना यासंबंधी मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत.
त्यात परीक्षा घेण्यासंबंधी उल्लेख आहे. कायद्यानुसार यूजीसीच्या या सूचना राज्य आणि विद्यापीठांना बंधनकारक असल्याचे काही तज्ज्ञ सांगत आहेत.
तर राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com