वर्षभरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी डिझेल व पेट्रोलची किंमत वाढली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-  पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी (दि. १५) अचानक पेट्रोलमध्ये ५० पैशांची दरवाढ करीत सामान्य वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावली आहे.

सध्या रोज किमती बदलत असल्यामुळे रोज किमान १० ते ५० पैशांची वाढ होत असल्यामुळे पेट्रोल व डिझेलमध्ये महिन्याला सरासरी एक रुपया दरवाढ होत आहे.

गेल्या वर्षभरात तब्बल १२ रुपयांनी डिझेल व पेट्रोलची प्रतिलिटर किंमत वाढली आहे. इंधन दरवाढीमुळे केवळ वाहनचालकच नाही, तर इतर क्षेत्रातील उत्पादन व सेवांची दरवाढ गगनाला भिडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जिणे खडतर बनत चालले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे दि. ३१ डिसेंबर रोजी पेट्रोलचा नाशिकमधील दर ९० रुपये ५३ पैसे प्रतिलिटर असा होता, तर सध्या तो ९१ रुपये ७९ पैसे इतका असून, १५ दिवसांत एक रुपया २६ पैशांनी दरवाढ झाली.

आहे. तसेच, डिझेलमध्ये १५ दिवसांत तब्बल सव्वा रुपयाची वाढ झाली आहे. दि. ३१ डिसेंबरला डिझेलचा नाशिकमधील दर प्रतिलिटर ७९ रुपये ४९ पैसे इतका होता, तर सध्या तो ८० रुपये ५८ पैसे इतका आहे. म्हणजेच डिझेलच्या दरात लिटरमागे एक रुपया नऊ पैसे इतकी दरवाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किमती वाढत असल्याने त्याचा परिणाम भारतातील किरकोळ इंधन दरवाढीत होत आहे. २०१८ मध्ये नाशिकमध्ये डिझेलचे दर ६६ रुपये ४० पैसे इतके होते. याचाच अर्थ गेल्या दोन वर्षांत १५ रुपयांची दरवाढ झाली आहे. डिझेलवर एका लिटरला ३० ते ४० रुपये कर द्यावा लागत असल्यामुळे इंधनात वाढ होत आहे. पेट्रोलच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, गेल्या दोन वर्षांत पेट्रोलच्या दरात सरासरी १२ रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलचे दर ८१ ते ८४ पर्यंत दोलायमान स्थितीत होते. मात्र, शेवटच्या तिमाहीत पेट्रोलच्या दरात कमालीची वाढ होत गेली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24