अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले आहे. दरदिवशी याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान हे प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनावरच शिंतोडे उडवण्यात आले.
यातच काहींवर निलंबनाची कारवाई देखील झाली. यातच जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने या प्रकरणावरून मोठा आरोप केला आहे.
नुकताच या प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडून काढून घेत श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.
दरम्यान बनावट डिझेल प्रकरणात राहुरी कनेक्शन समोर आल्यानंतर सूत्रधाराच्या बचावासाठी मंत्र्यांच्या दबावातून ‘त्या’ पथकातील पोलिसांना सस्पेंड करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केला.
सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी एसपींची भेट घेतली, त्यांनी अटकेचे आश्वासन दिले आहे. मात्र अटकेस टाळटाळ झाली तर एसपी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल असा इशारा कर्डिले यांनी यावेळी दिला
काही दिवसांपूर्वी नगरमध्ये कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी पोलिसांनी डिझेलच्या बेकायदा विक्रीचा उद्योग उघडकीस आणला होता.
याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असलं तरी मुख्य सूत्राधार अजून मोकाटच आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आता या प्रकरणात लक्ष घातलं असून
कर्डिले यांनी सोमवारी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेवून निवेदन दिलं. बनावट डिझेल व नाप्ता भेसळ रॅकेटचा तपास योग्य पध्दतीने करून मुख्य सूत्रधारास तातडीने अटक करण्याची मागणी कर्डिले यांनी निवेदनाव्दारे केली.
डिझेल भेसळीबाबत कारवाई होवून पंधरा दिवस लोटले तरी अद्याप या प्रकरणात मुख्य सूत्रधार तसेच आरोपींना अटक झालेली नाही.
पोलिसांवरील राजकीय दबावामुळे कारवाईस विलंब होत असून लवकरात लवकर प्रकरणाचा तपास न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कर्डिले यांनी दिला आहे. यावेळी राहुरी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved