Maharashtra News : गर्भलिंगनिदान चाचणीच्या दुष्परिणामामुळे मुलींची घटलेली संख्या, लग्न जमवताना वाढीभाव प्रथा, चांगल्या शिक्षणाचा आभाव, शासकीय नोकरीची अपेक्षा, बेरोजगारी, कमकुवत आर्थिक परिस्थिती,
शाश्वत पाण्याआभावी तोट्यातील शेती व्यवसाय, या व इतर अनेक कारणांमुळे सध्या वंजारी समाजातील मोठ्या प्रमाणात युवक विवाहाचे वय होऊनही विवाहापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे,
त्यामुळे समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी सर्व मतभेद बाजूला ठेवुन एकत्रितपणे या समस्येवर मात करावी, असे आवाहन राज्याचे प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांनी केले.
क्षेत्रीय वंजारी एकता परिषद यांच्या वतीने शहरातील विठोबा राजे लॉन्स येथे पार पडलेल्या वंजारी समाज वधुवर सुचक भव्य परिचय मेळाव्यात अध्यक्षपदावरून खेडकर बोलत होते.
या वेळी अजिनाथ आंधळे महाराज, अॅड. प्रताप ढाकणे, डॉ. मृत्युंजय गर्जे, अर्जुनराव शिरसाट, अशोक गजें, भगवान आव्हाड, दादासाहेब मुंडे, गोकुळ दौंड, माणिक खेडकर, धनंजय बडे, शिवाजी मुंडे,
राजेंद्र दौंड, नारायण पालवे, अमोल गजें, भगवान दराडे, विष्णुपंत ढाकणे, देविदास खेडकर, अॅड. दिनकर पालवे, अॅड. वैभव आंधळे, अॅड. हरिहर गजें,
अॅड. संपत गर्जे, अॅड. प्रतिक खेडकर, राणाप्रताप पालवे, किसन आव्हाड, डॉ. अजित फुंदे, प्राचार्य अशोक दौंड, मिथुन डोंगरे, महादेव जायभाये, गंगा खेडकर, महेंद्र शिरसाट, वसंत खेडकर, सुभाष केकाण, राम लाड, संदिप पालवे, विठ्ठलनाना खेडकर, महादेव दराडे, पोपटराव बडे, राजेंद्र नागरे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खेडकर म्हणाले की, पंधरा वीस वर्षांपूर्वी प्रगत तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात केल्याने मुलींची संख्या घटली आहे. रोजगार नाही, ऊसतोडणी, या युवकांचे विवाह न होण्या मागील मुख्य अडचणी आहेत.
माझी आर्थिक परिस्थिती चांगली असून, भविष्याचीही चिंता नाही. युवकांना चांगल्या नोकऱ्या मिळत नसल्याने लग्न होत नाहीत. पुढील महिन्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करणार असून, पाथर्डीच्या माळरानावर दोन शेतीपुरक उद्योग सुरु करून युवकांना रोजगार देण्यात येईल.
या वेळी अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले की, वंजारी समाज हा बुध्दीने ब्राम्हण समाजापेक्षाही हुशार आहे. कष्ट करण्याची व कुठल्याही संकटांना तोंड देण्याची क्षमता आहे. समाजातील युवकांनी वीस लाख रुपये देऊन नोकरी मागे न धावता पाच लाख रुपयांत व्यवसाय सुरु करावा.
या वेळी वसंतराव खेडकर, शिवाजी मुंडे, भगवान आव्हाड, राजेंद्र दौंड, दादासाहेब मुंडे, यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हभप अजिनाथ आंधळे यांनी लग्न जमवितांना वाढीभाव प्रथा रद्द करण्यासाठी ठराव मांडला त्यास उपस्थितांनी पाठिंबा देत ठराव मंजुर केला.
प्रास्ताविक माजी पंचायत समिती सभापती संभाजीराव पालवे यांनी, सूत्रसंचालन उद्धव काळापहाड तर बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट यांनी आभार मानले.