अहमदनगर :- आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी हेच भाजपचे उमेदवार राहतील, असे स्पष्ट संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे तीन वेळा निवडून आलेले खासदार दिलीप गांधी यांच्यासारखे अनुभवी, सिनिअर उमेदवार आहेत.
त्यांचे नाव अंतिम झालेले नसले तरी बाहेरून भाजपमध्ये डोकावणार्यांना थारा नाही. त्यांनी भाजपमध्ये डोकावू नये, असा सल्ला पालकमंत्री राम शिंदे यांनी काल नगरमध्ये दिला.
दिलीप गांधी चौथ्यांदा निवडणूक लढवतील…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. मात्र, दक्षिण मतदारसंघातून इच्छुकांसंदर्भात तसेच उमेदवारीबाबत विचारले असता,
त्यांनी दिलीप गांधी यांनाच उमेदवारी मिळेल असे संकेत दिले आहेत.पालकमंत्री म्हणाले की, पक्षात इच्छुक असतातच.आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत.
दिलीप गांधी चौथ्यांदा निवडणूक लढवतील. मात्र, बाहेरून येणाऱ्यांना स्थान मिळणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मतदारच विरोधकांना उत्तर देतील…
निवडणुकांच्या तोंडावर कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते पवार यांच्या कुटूंबियांचे दौरे वाढले आहेत.
पवार यांच्या आरोपांना मी विकास कामाद्वारे उत्तर देणार असून 10 वर्षात मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभा केला आहे. मतदारच विरोधकांना उत्तर देतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.