दिपाली सय्यद म्हणतात खा.सुजय विखेंनी फसविले….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा :- तालुक्यातील 35 गावांसाठी जीवनदायी ठरणारी साकळाई योजना पूर्ण तत्त्वास व्हावी, या मागणीसाठी दि.9 ऑगस्ट रोजी जुन्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील पटांगणात अमरण उपोषण करणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साकळाई देवीचे दर्शन घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली जाणार आहे. साकळाई योजनेचे आतापर्यंत निवडणूक लढण्यासाठी उपयोग करून घेतला आहे.

खासदार सुजय विखे यांनीही हा मुद्दा निवडणुकीपूर्वी घेतला होता यापूर्वीच्या तालुक्यातील राजकीय नेत्यांनीही सकाळी योजनेचा मुद्दा फक्त निवडणुकीत काढला परंतु परंतु योजना पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा केला नाही.

या योजनेचे पन्नास वर्षापासून राजकारण चालू आहे योजना पूर्ण व्हावी म्हणून आपण मुख्यमंत्री यांना उपोषणा पूर्वी भेटणार आहोत साकळाई योजनेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील गावांना या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार नसेल तर त्यासाठी आम्ही प्रशासनाला पर्याय सुचविणार आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणतात हा विषयी मार्गी लागू शकत नाही. परंतु ही योजना होण्यासाठी आपण अखेरपर्यंत लढा देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24