अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील कोरोनाबाधित पोलिसाचे कनेक्शन थेट मुंबईतील “राजभवना”शी निगडित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संबंधित पोलिस राज्यपालांच्या ताफ्यातील एका वाहनावर चालक म्हणून काम करत होता, अशी माहिती शनिवारी सायंकाळी स्थानिक प्रशासनाला समजली आहे.
दरम्यान, संबंधित पोलिसाच्या पत्नीला व मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तहसीलदार नामदेव पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी ही माहिती राजभवनात कळवली आहे.
कळंबोली (नवी मुंबई) येथून चिंचपूर इजदे येथे आलेल्या पोलिसाचा अहवाल गुरुवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. एक जूनला संबंधित पोलिस व त्याचे कुटुंब गावाकडे आले होते.
दुसऱ्याच दिवशी पोलिसाला त्रास झाल्याने पाथर्डीतील उपजिल्हा रुग्णालयात त्याला तपासण्यात आले. त्यानंतर नगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली.
दरम्यान, तालुका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या चौकशीत पोलिसाचे ‘राजभवन’ कनेक्शन उघड झाले. राज्यपालांच्या ताफ्यातील एका वाहनावर चालक म्हणून २८ मेपर्यंत कामावर असल्याचे त्याने सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews