अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शनिशिंगणापूर शंकरराव गडाख हे नेवासे मतदारसंघातून शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या बॅट चिन्हावर विजयी झाले आहेत. नंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.
शिवसेनेने त्यांना कॅबिनेट मंत्री केले असले, तरी मी मात्र शिवसेनेत गेलेलो नाही. माझा पक्ष ठरलेला आहे, असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्पष्ट केले.
या विधानाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. जलसंधारण मंत्री गडाख व जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राजश्री घुले यांचा नागरी सत्कार रविवारी नेवासे शहरात झाला.
या वेळी बोलताना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीने आपापसात भांडत न बसता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
भांडत बसलात, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वैतागून राजीनामा देतील. ठाकरे यांच्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे नीट रहा, असा वडिलकीचा सल्ला दिला.
शंकरराव गडाख यांनी माझ्याशी चर्चा करूनच शिवसेनेला पाठिंबा दिला. हे जरी खरे असले, तरी मी मात्र शिवसेनेत गेलेलो नाही. माझा पक्ष ठरलेला आहे, या ज्येष्ठ नेते गडाख यांच्या वक्तव्याने सगळ्यांनाच संभ्रमात टाकले आहे.