महाराष्ट्र

पुन्हा नामुष्की, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 maharashtra news : महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीच संवेदनशील विषय राहिला आहे. यावेळीही असेच झाले.

काल रात्री राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या करण्यात आल्या होत्या.

आज सकाळी त्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे. रात्रीतून चक्रे फिरली आणि अवघ्या काही तासांमध्येच ही स्थगिती देण्याची वेळ आली आहे.

विशेषत: मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि बदलीसंबंधी हा स्थगितीचा निर्णय असल्याचे सांगण्यात येते. गृहविभागाने काढलेल्या या आदेशावर सरकारचे एकमत नसल्याने ही वेळ आल्याचे सांगण्यात येते.

Ahmednagarlive24 Office