अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे यात समाविष्ट आहेत.
महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
अशीच एक धक्कादायक नात्याला काळिमा फासणारी घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली आहे. नात्याने मामा असलेल्या एका युवकाने भाचीवर अत्याचार केला आहे.
तसेच त्याच्या ओळखीच्या एका हॉटेलचालकानेदेखील पीडितेवर अत्याचार केला. दिलीप संतोष साठे असे त्या आरोपी मामाचे नाव आहे.
यात सावत्र मामासह त्याची आई व एका हॉटेलचा मालक अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी: सदर पीडिता राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे वडील, भाऊ व बहीण यांच्यासह रहाते.
या पीडित मुलीची आत्याही तेथेच राहते. आत्याच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती दिलीप संतोष साठे याच्याबरोबर रहाते. आत्याने घरी बोलाविल्यामुळे ही पीडित मुलगी आत्याच्या घरी गेली होती.
यावेळी नात्याने सावत्र मामा असलेल्या दिलीप साठे पीडित मुलीला म्हणाला, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. असे म्हणून त्याने एक मणी मंगळसूत्र घातले.
त्यानंतर दिलीप साठे याने दि.15 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2020 दरम्यान त्याच्या घरा जवळ पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर आरोपी दिलीप साठे याने दि. 19 ऑक्टोबर रोजी पीडित मुलीला एका हॉटेलात नेले.
तिची हॉटेल मालकाशी ओळख करून दिली. यावेळी हॉटेल मालकाने देखील दोन दिवस पीडित मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved