अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : लॉकडाऊन काळात विनापरवाना कारमधून केलेला नगर-पुणे प्रवास जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या चांगलाच अंगलट आला.
महसूल प्रशासनाच्या फिर्यादीवरून बेलवडे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. नावंदे यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
नावंदे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिल्या. पदभार घेतल्यानंतर काही दिवसांतच क्रीडा संघटना व त्यांच्यात वाद झाला. क्रीडा संघटनांनी रस्त्यावर उतरून नावंदे यांच्याविरोधात आंदोलने केली.
परिणामी नावंदे यांच्या बदलीचा आदेश निघाला, परंतु काही दिवसांतच तो रद्द झाला. काही महिन्यांपूर्वी नावंदे यांनी वाडिया पार्क येथील महसूल विभागाच्या काही कार्यालयांना भाडे न मिळाल्याने टाळे ठोकले होते.
नावंदे यांच्या या कृतीने महसूल प्रशासनात नाराजीचा सूर उमटला. त्याचाच वचपा प्रशासनाने गुरुवारी काढला. आपल्या गाडीने पुण्याहून नगरकडे येत असलेल्या नावंदे यांच्याकडे पास नसल्याने श्रीगोंदे महसूल प्रशासनाने त्यांना ताब्यात घेत फिर्याद नोंदवली.
भविष्यात महसूल प्रशासन व जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्यातील हे शीतयुद्ध उफाळून येण्याची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews