अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- सध्या दिवाळीची धुमधाम सुरु असून नुकतेच केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना एक सुखद धक्का दिला आहे. केंद्राने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
याबतच निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचारी मोठ्या कालावधीपासून महागाई भत्त्याची मागणी करत होते. 5 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची सुद्धा दखल घेण्यात आली आहे.
केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महागाई भत्त्याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. काही नियमांच्या अधिन राहून हा भत्ता मिळणार आहे.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय स्वायत्त संस्था पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या प्रभावानं अधिकच्या भत्त्यात घट करण्यात आली होती. पण आता सरकरनं हा निर्णय घेतल्यानं लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती गोठवण्यात आल्या होत्या पण आता यात सातत्यपूर्ण वाढ करण्याचा निर्णया केंद्रीय अर्थमंत्रालायनं घेतला आहे.