अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत व्यवसायिक आपले दुकाने सुरु ठेवत होती. यामध्ये वेळेची मर्यादा देण्यात आली होती.
मात्र आता दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रापशासनाने दिवाळीनिमित्त व्यवसायिकांसाठी खास धमाका ऑफर आणली आहे.
कोरोना महामारीच्या काळात दुकाने सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेली अट आता शिथिल करण्यात आली आहे. आता बाजारपेठेतील सगळ्याच प्रकारची दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे.
निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित यांनी तसे आदेश काढले आहेत. शाळा, मंदिर, स्वमिंग टँक आणि पिक्चर थिएटर मात्र 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
सध्याच्या स्थितीत प्रशासनाच्या आदेशानुसार बाजारपेठेतील दुकाने सकाळी नऊ ते रात्री 9 वाजेपर्यंतच खुली करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. काल शुक्रवारी (दि.30) हे निर्बंध हटविण्यात आले आहेत.
अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक अशा सगळ्याच प्रकारची दुकाने आता 24 तास सुरू राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास घालण्यात आलेली मनाई मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
याशिवाय रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या फिरण्याचे निर्बंधही कायम आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved