अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा कॉलेज अद्यापही बंदच ठेवण्यात आल्या आहेत. यातच जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील शिक्षकांची यंदाची दिवाळी पगाराविना बेरंग झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या, वेळेवर वेतन करण्याबाबतच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन सातत्याने विलंबाने होत आहे.
ऐन दिवाळीत शिक्षक वेतनापासून वंचित राहिल्याचे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी सांगितले. प्रसिद्धिपत्रकात ठुबे यांनी म्हटले आहे,
की शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षकांचे वेतन दीपावलीपूर्वी देऊ शकलेला नाही. दीपावलीसाठी शासनाने सर्वच कर्मचाऱ्यांना 12 हजार रुपये सण अग्रीम मंजूर केला आहे;
परंतु तोही दीपावली संपल्यानंतरच शिक्षकांच्या खात्यावर जमा होईल. शिक्षक परिषदेने वेळोवेळी जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन वेळेवर होण्यासाठी सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाला विनंती केली. शिक्षकांच्या वेतनीसंबंधात सुधारणा न झाल्यास शिक्षक परिषदेस आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
शिर्डीत होणाऱ्या शिक्षक परिषदेच्या राज्यव्यापी विभागीय बैठकीत संस्थापक आमदार संजय केळकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे शिक्षकांनी म्हंटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved