अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-यंदा दीपावलीचा सण १४ नोव्हेंबरला साजरा होत असल्याने राहुरीत फटाका स्टाॅल लावण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे.
फटाका विक्रीसाठी लागणाऱ्या स्टाॅलच्या जागेचे वाटप नुकतेच करण्यात आले. राहुरी शहर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाका स्टाॅलच्या माध्यमातून राहुरी नगर परिषदेला ६० हजार रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचे सावट असल्याने यंदा फटाका स्टाॅल लावण्याऱ्या विक्रेत्यांची उत्सुकता तसेच पैसे कमी होतील ही अपेक्षा होती. मात्र, ती व्यर्थ ठरली आहे.
स्टाॅलसाठी मागीलप्रमाणेच इच्छुकांची संख्या पाहता नगर परिषद प्रशासनाचे यंदा चांगलेच फावले. एक नंबर स्टाॅलसाठी तब्बल १८ हजार रुपयांपर्यंत बोली लावण्याची वेळ फटाका व्यावसायिकावर आली.
जी. एस. टी. सह एक नंबर स्टाॅलला २२ ते २३ हजार रुपये विक्रेत्याला भरावे लागले आहे. मागील वर्षी एक नंबर स्टाॅलसाठी १० हजार रुपयांपर्यंत खर्च झाला होता.
यावर्षी फटाक्याचे २१ स्टाॅल लावण्यात आले असून शेवटच्या स्टाॅलसाठी १० हजार रुपये मोजावे लागले आहे. या फटाका स्टाॅलसाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved