अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- चालू रेल्वेतून पडलेल्या तरुणीने पोलिसांना आपल्यावर कोणीही अत्याचार केला नाही किंवा मला कोणीही ढकलून दिले नाही .
चक्कर आल्यामुळे मी लोकलच्या दरवाजातून खाली पडले, अशी जबानी वाशी खाडीतील रेल्वे पुलावर जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणीने शुद्धीवर आल्यानंतर दिली.
मंगळवारी पहाटे ती बेशुद्धावस्थेत ट्रकवर सापडली होती. हि तरुणी टिटवाळा येथे राहते. पोलिसांनी आधी अत्याचाराचे गुन्हे दाखल केले होते. पण नंतर तिच्या जबानीनंतर ते माघे घेण्यात आले आहेत.
तिच्या जबानीतून घडून गेलेल्या घटनांचा उलगडा झाला आहे. चक्कर आल्यामुळेच मी दरवाजातून खाली पडले असे तिने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी अत्याचाराच्या शक्यतेवरून दाखल केलेल गुन्हे मागे घेतले आहेत.
सीसीटीव्हीमध्ये एकटीच :- या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तिच्याबरोबर कोण कोण होत ह्याही पडताळणी करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.दादरपासून वाशीपर्यंत हि तरुणी एकटीच असल्याचे त्यात दिसून येत होते. वाशी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तपास करत आहे.
तरुणी नऊ तास ट्रॅकवर पडून :- बॉयफ्रेंडबरोबर भांडण झाल्यामुळे हि तरुणी एकटीच फिरत होती. रात्री साडेआठच्या सुमारास लोकल वाशी खाडीपुलावर आल्यानंतर ती खाली पडली. दोन्ही ट्रॅकमॅनच्या मध्ये मोठा खड्डा होता, ती तरुणी त्यात पडली. त्यामुळे कोणत्याही मोटरमनच्या लक्षात हा प्रकार आला नाही. सकाळी तिला जग आल्यानंतर ती वर आली आणि मग मोटरमनच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्यानंतर पोलीस पथकाने तिथे धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केले.