शेतकऱ्यांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्या कडून बक्षीस म्हनुन आमदारकी मिळते का ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- सदाभाऊ यांची ऑफर नाकारणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्यावर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पलटवार केला आहे. सदाभाऊ खोत हा मदतीचा हाथ पसरला आहे अश्या प्रकारच्या वलग्ना राजु शेट्टी स्व:ता काल पासून करत आहेत.

स्वाभिमानीच्या दाराकडे जाण्यासाठी आमचे कार्यकर्ते हे लांडग्याच्या वळचणीला जाणार नाहीत. माझा वाघाचा बच्चा आहे तो जाणार नाही. अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे होते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

माझे हात स्वच्छ आहेत आणि स्वच्छ हाथा बरोबर आम्ही जाऊ अस म्हणणाऱ्या राजू शेट्टीने, अनेक शेतकरी हे आंदोलनात गोळ्या घालून मारली गेली. त्यावेळी राजू शेट्टी तुम्ही म्हणाला होता राष्ट्रवादी म्हणजे ही आली बाबा चाळीस चोरांची टोळी आहे. आणि त्याच टोळीत आता आमदारकीच्या तुकड्या साठी तुम्ही आमरस खायला जाता.

शेतकऱ्यांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्या कडून बक्षीस म्हनुन आमदारकी मिळते का हे चालले आहे या तून कोणाचे हाथ स्वच्छ आहेत का ते कळेल, असा टोला ही सदाभाऊ यांनी लगावला. ज्या शेतकऱ्यांचा बळी गेला त्यांच्या रक्तांनी राजू शेट्टीचा चेहरा बरबटला आहे. रंगला आहे, अस सांगून खोत पुढे म्हणाले,

राज्यपालच्या कोटयातुन झोळी मध्ये निर्वाष्याला टाकावे तसे तुम्हाला निर्वासित म्हणून टाकले आहे.राजु शेट्टीच निर्वासित आहेत. मजबूत हाथाचे असणारी आम्ही माणस कश्याला आम्ही येऊ तुमच्या सोबतीला हाथात कटोर्या घेऊन भीक मागायला. कडकनाथ हे जन्माला घातलेलं पिल्लू हे राजू शेट्टी तुमचंच आहे.

अशी अनेक पिल्लू तुम्ही जन्माला घातले. मी मंत्री झालेले तुम्हाला डोळ्यात खुपले कारण राजू शेट्टी तुम्हाला तुमचा सहकारी मोठा झालेला तुम्हाला चालत नाही. जे मिळेल ते मलाच मिळाले पाहीजे.माझ्या शिवाय बहुजन समाज्यातील कोणाला ही संधी मिळाली नाही पाहीजे शकुनी मामाची भूमिका आयुष्य भर राजू शेट्टी यांनी घेत आला आहात.

पहाट झाली की कडकनाथ कोंबड्या सारख आता तुम्ही कडकनाथ कोंबडा झाला आहात आणि आरोळी ठोकत आहात.वैफल्य ग्रस्त होऊन खोट्या आरोळ्या ठोकुन तुम्हाला साहानुभूती मिळू शकत नाही, ज्यांची चौकशी ईडी ने करावी अस म्हणनाऱ्याच्या पंगतिलाच तुम्ही जाऊन जेवायला बसला.

माझ्या विरोधात ही तुम्ही ईडी कडे गेला होता. आणि चहा पिऊन वाजत गाजत गावाकडे आला होता. फसवाफसवीचा धंदा बँद करा. आम्हाला तुमच्या वळचणी ला यायाची गरज नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटने मध्ये आम्हाला यायची गरज नाही अस ही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल्यावर प्रमाणे शेतकमाल खरेदी संदर्भात कायदा करत असाल तर करा आम्ही तुमचे स्वागत करतो. परंतु केंद्राचा कायदाच आम्ही लागू करणार नाही शेतकऱ्यांना मुक्तता देणार नाही अस म्हणत तुम्ही शेतकऱ्यांना मार्केट कमिटी मध्ये माल विकला पाहिजे अशी चुकीची भूमिका घेत आहात.

मार्केट कमिटी मध्ये आपले सर्व चेले पै पावणे असतील त्यांचा शेतकरी गुलाम झाला पाहीजे अस धोरण राज्यात महाविकास आघाडीने राबविले तर त्याला रयत क्रांती संघटना ताकतीने विरोध करेल बळीराज्याचे स्वातंत्र्य कोण हिरावून घेऊया ही मोठी यात्रा आम्ही राज्य भर काढणार, असा इशारा ही सदाभाऊ खोत यांनी दिला.

कोरोना काळात शेतकरी आणि कामगार ही सगळी मंडळी च वीज बिल 100 टक्के माफ केले पाहिजे मात्र गेंड्याच कातडं पांगरलेल्या या सरकार ला जाग यायला तयार नाही, जे ऊर्जा मंत्री बोलत आहेत जे वापरले आहे ते वीज बिल द्यावे लागेल असे म्हणता,

तुम्ही विरोधी बाकावर बसला होता तेंव्हा महापूर आणि दुष्काळाच्या काळात टाहो फोडून सांगत होता विज बिलात सूट ध्या आणि माफीद्या ,आणि आता दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता वापरले आहे ते द्यावे लागेल जे म्हणजे जनतेशी केलेली प्राथंडा आहे. अशी प्रतिक्रीया सदाभाऊ खोत यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

अहमदनगर लाईव्ह 24