महाराष्ट्र

तुम्हाला देखील दम्याचा त्रास आहे का? घरामध्ये लावा ‘हे’ रोप आणि मिळवा आराम! एक रोप देईल तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे

Published by
Ahmednagarlive24 Office

सध्याच्या धकाधकीचे आयुष्य आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांनी डोके वर काढले असून अनेक असाध्य आजार अनेक जणांना जडल्याची सध्या स्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने बदललेले आहारपद्धती यामुळे हृदयरोग तसेच उच्च रक्तदाबा सारख्या समस्या तसेच डायबिटीस व वाढत्या प्रदूषणामुळे दम्यासारख्या आजाराने देखील मोठ्या प्रमाणावर डोके वर काढायला सुरुवात केलेली आहे.

या सगळ्या आजारांमध्ये जर आपण दमा हा आजार बघितला तर किती जणांना हा अनुवंशिक स्वरूपाचा असतो व याच्यामुळे बरेच व्यक्ती त्रस्त झाल्याचे परिस्थिती आहे. या आजाराच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. परंतु यासारखे जर आजार होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर काही घरगुती उपाय करणे देखील गरजेचे असते.

तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये कुणाला दम्याचा त्रास असेल किंवा घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असेल तर तुम्ही घरामध्ये निर्गुंडी ही वनस्पती लावणे गरजेचे आहे.ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून यीचे औषधी महत्त्व देखील खूप जास्त आहे.

निर्गुंडी वनस्पतीचे फायदे

1) निर्गुंडीचा वापर अनेक रोगांवर उपचार म्हणून केला जातो. ही वनस्पती शरीराला कुठल्याही प्रकारच्या आजारापासून वाचवायला मदत करते. उदाहरणच घ्यायचे झाले तर फुफ्फुसामध्ये सूज येणे, छातीत दुखणे किंवा जडपणा, शरीरात पेटके इत्यादी समस्येवर जर तुम्ही या वनस्पतीच्या पानांचा वापर करून किंवा बिया वापरल्या तरी आराम मिळतो.

2) बऱ्याच जणांना लघवी करताना त्रास होतो किंवा लघवी करताना जळजळ जाणवते. या समस्यावर देखील निरगुंडी खूप रामबाण उपाय आहे. एवढेच नाहीतर रक्ताच्या संबंधित सर्व विकारांवर देखील ही उपयुक्त आहे.

3) तसेच रक्त शुद्धीकरण म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तसे पाहायला गेलं तर निर्गुंडीचा वापर हा शरीरातील नसा निरोगी ठेवण्यासाठी आणि मज्जा संस्थेशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांसाठी केला जातो व याचा उपयोग डेकोकशन, पावडर आणि गोळ्या बनवून केला जातो व ते खूप चांगले कार्यकरते.

4)सर्दी, खोकला तसेच कफचा त्रास असेल तर निरगुंडी वनस्पतीचा हर्बल चहा तुम्ही पिऊन त्यावर आराम मिळवू शकतात.

5) तसेच या वनस्पतीचे सेवन पचनक्रियेमध्ये देखील मदत करते व यामुळे मळमळ तसेच बद्धकोष्ठता, गॅस, उलट्या इत्यादी पचनसंस्थेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. या वनस्पतीच्या पानाच्या रसामुळे पचनाचे विकार देखील टाळता येतात.

6) निर्गुंडी वनस्पतीची पाने सुकवून त्यांची पावडर बनवली व ती विस्तवावर ठेवल्यास डास घरापासून दूर राहतात.

7) निर्गुंडीमध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असते व इतर महत्वाचे पोषक घटक देखील आढळून येतात. यामुळे त्वचेवरील मुरूम तसेच इतर समस्या टाळण्यास मदत मिळू शकते. निर्गुंडीचा रस पिणे यासाठी फायदेशीर ठरते.

Ahmednagarlive24 Office