ऐकलत का…..मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आहे अहमदनगरमध्ये प्लॉट !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील.

आणि त्यातून आपल्याला त्यांची संपत्ती कळेल असे वाटत होते. आज त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात अहमदनगरमध्ये प्लॉट असल्याचे लिहून दिले आहे.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला व्यवसाय सर्व्हिस असा दिला.

उद्धव ठाकरेंची एकूण जंगम मालमत्ता 24 कोटी 14 लाख इतकी आहे.​कॅश इन हॅंड, बँक डिपॉझिट्स, शेअर्स, बाँड्स, फंड्स – 21 कोटी 68 लाख विमा पॉलिसी, दागिने हे सर्व मिळून त्यांची मालमत्ता 24 कोटी 14 लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.

अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स त्यांची एकूण किंमत – 4 कोटी 20 लाख इतकी आहे. त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत – 13 कोटी 64 लाख इतकी आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24