अहमदनगर लाईव्ह टीम / नागपूर : : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन शिवसेनेने दिले होते आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे. आम्हाला स्मृतिभ्रंश झाल्याचे समजून आठवण करून देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले ‘अच्छे दिन’ कधी येतील ते आधी सांगा आणि नोटाबंदीचे काय झाले याचे उत्तर देशाला द्या, असा ‘ठाकरी’ पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.
सावरकरांच्या प्रकरणाच्या नावाने शिवसेनेला हिंदुत्व शिकविणारे जर हिंदुत्वाचा बुरखा घालून देशाच्या मुळावर घाव घालणार असतील तर ते कदापी सहन केले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित शिवसेना मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेबोलत होते.
ते म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश मिळून अखंड भारताची निर्मिती करण्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या आधारावर भाजपासोबत युती केली होती. मात्र पाकिस्तान, बांगलादेशात असलेल्या हिंदूना धक्का लागू न देण्याची, त्या देशाला ताकीद देण्याऐवजी केंद्र सरकार तेथील हिंदूनाच भारतात आणत आहे.
दुसऱ्या देशातून किती लोक येणार, त्यांचे पुनर्वसन कुठे करणार, याचे उत्तर सरकारने द्यावे. कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. तेथील मराठी माणसांवर होणारा अन्याय कधी संपणार? तेथील मराठी माणूस हासुद्धा हिंदूच आहे