गजा मारणे स्वत:ला रॉबिनहूड समजतो का?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत तुरुंगातीलही गर्दी रोखण्यासाठी अनके आरोपींना पॅरोल व फर्लोवर सोडले.

मात्र या आरोपींपैकी गजा मारणे (अर्जदाराने) याने तुरुंगातून सुटल्यानंतर अर्जदाराने मोठी गर्दी जमवत भव्य मिरवणूक काढल्याबाबत खंडपीठाने आश्चर्च व्यक्त केले, तसेच अर्जदार आरोपी गजा मारणे स्वत:ला रॉबिनहूड समजतो का? असा सवाल उपस्थित करत खंडपीठाने फटकारले.

या प्रकरणीची पुढील सुनावणी आता खंडपीठाने ५ एप्रिलला ठेवली आहे. १५ फेब्रुवारी २०२१ मध्ये पुणे विषेश न्यायालयाने सबळ पुरव्यांअभावी गजा मारणे याची निर्दोष मुक्तता केली. यामुळे मारणे याला नवी मुंबईतील तळोजा तुरुंगातील सोडण्यात आले.

यावेळी गजा मारनेला निर्दोष मुक्त केल्यावर तळोजा कारागृहाच्या बाहेर साथीदारांची मोठी गर्दी झाली होती. याच कारागृहाच्या प्रवेशद्वारावर गजा मारनेचे जंगी स्वागतही करण्यात आले. मारनेच्या साथीदारांनी ४००-५०० वाहन्यांच्या ताफ्यासह मुंबई-पुणे-एक्स्प्रेस-वेवरून त्याची जंगी मिरवणूक काढत स्वागत केले.

त्यांनी उर्से टोलनाक्यावर फटाके फोडून गदारोळ घालण्यात आला. यावेळी समर्थकांनी पुणे टोलनाक्यावर या गाड्यांनी टोलही भरला नाही. तसेच मोठ्या संख्येने गाड्या आणल्यामुळे वाहनांची प्रचंड तुंबळ झाली होती. तसेज या साऱ्या मिरवणुकीचे चित्रीकरण ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले.

तसेच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी मारने टोळीवर मोठी कारवाई करत विविध पोलीस स्थानकात गुन्हे नोंदवले आहेत. यानंतर गजा मारणेने आपल्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याच याचिकेवर सोमवारी न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडापीठासमोर सुनावणी सुरु होती.

सरकारी वकील अरुणा पै यांनी आरोपीला त्यांचे समर्थक महाराज संबोधतात. तसेच तुरुंगातून सुटका झाल्यावेळीही मारणेच्या समर्थकांनी आला रे आला, माझा बाप आला अशा घोषणा दिल्या होत्या.

असे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी खंडपीठाने, कोरोना नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याप्रकरणी मारणेविरोधात पोलिसांत तात्काळ गुन्हा का नोंदवला नाही? यासाठी तीन दिवस का घेतले. असे प्रश्न उपस्थित केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24