महाराष्ट्र

मराठा समाजातील आमदार, खासदार, मंत्री यांना मराठ्यांना आरक्षण खरच गरजेचे आहे, हे कळत नाही का?

Published by
Ahmednagarlive24 Office

आगामी निवडणुकीपूर्वी मराठा समाजास आरक्षण जाहीर करावे अन्यथा मराठा समाजाची भूमिका वेगळी असेल, असा इशारा स्वाभिमानी मराठा महासंघाच्या मंथन बैठकीत पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी मराठा महासंघाची मंथन बैठक नुकतीच पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथे संघटना कार्यालयात पार पडली, या वेळी हा इशारा देण्यात आला आहे.

मराठा समाज आरक्षणासाठी वर्षानुवर्षे लढा देत आहे. कै. अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणावर मराठा समाजात जागृती केली, तेव्हापासून मराठा समाज आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे. मग मराठा समाजातील आमदार, खासदार, मंत्री यांना मराठ्यांना आरक्षण खरच गरजेचे आहे, हे कळत नाही का? पण समाजाची फक्त मते घ्यायची आणि सत्तेत जाण्यासाठी समाजाचा वापर करायचा, ही मानसिकता मराठा नेत्यांची आहे,

त्यामुळे मराठा नेत्यांनी आरक्षण व मराठा समाजाच्या प्रश्नी पावसाळी अधिवेशनात बोलते व्हावे आता मराठा नेते बोलते व्हावे, यासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाचे पदाधिकारी आमदार, खासदार व मंत्र्यांना निवेदन देणार आहेत. येत्या निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर करा, अन्यथा मराठा समाजाची भूमिका वेगळी असेल, असा इशारा स्वाभिमानी मराठा महासंघाच्या मंथन बैठकीत सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.

बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय चिटणीस सलील सूर्यवंशी, प्रदेश कार्याध्यक्ष दीपक दादा पवार, युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, संस्थापक व अध्यक्ष कृषिराज टकले, प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रशांत गडाख, वैद्यकीय आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. नंदिनी रिंढे, प्रदेश संघटक विजय पवार, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष अनिता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मायाताई देशमुख, संपर्क प्रमुख दिनेश पवार,

दक्षिण मुंबई अध्यक्ष वैभव पाटील, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख देवदत्त पोखरकर, राज्य प्रचारक अशोक माने, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अनंत पोळ, राज्य प्रवक्ते उत्तराताई देशमुख, मनोज माने, युवती प्रदेशाध्यक्ष दिपिका भामरे, महेंद्र निंबाळकर, रामभाऊ मोगल, अरविंद वरवटकर, सुदाम थोरे, कार्याध्यक्ष डॉ. राधा गमे, शरद खांदे, जितेंद्र मराठे, ओंकार देशमुख, सविता खोजे, ज्योती सगर, स्मिता वाघोले, भालचंद्र पाटील, ज्ञानेश्वर मोडक, मराठाभूषण चंद्रकांत लबडे, राहुल दुसंग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश गायकवाड यांनी केले.

Ahmednagarlive24 Office