अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-कोरोनावर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणो संयुक्तिक ठरणार नाही. कोरोनावर जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा किंवा महाविद्यालये सुरू करू नयेत,अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय बदलून पुन्हा ऑनलाईन शिक्षण चालू ठेवण्यात येणार आहे. हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढल्याचे निर्दशनास आले आहे.
इतर राज्याप्रमाणे आपल्या राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे शाळा निर्जंतुकीकरण, शाळा स्वच्छता व कोरोनापासून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्या सुरक्षितता व खबरदारीचा उपाय म्हणून सध्या तरी शाळा उघडणे संयुक्तिक होणार नाही.
जोपर्यंत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांची कोरोनापासून पूर्ण सुरक्षिततेची हमी शासन घेत नाही. कोरोना लस उपलब्ध होत नाही.
तोपर्यंत शाळा उघडण्याचा निर्णय घेऊ नये. शिक्षण क्षेत्रात भावनात्मक, मानसिक, शारिरीकदृष्टया गुरू-शिष्य यांचा संपर्क होत असतो. त्यामुळे इतर क्षेत्रांशी शिक्षण क्षेत्राची तुलना होऊच शकत नाही. कोरोनाची संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आल्यावरच शाळा सुरू करण्यात याव्यात, असेही परिषदेने पत्रकात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved