अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात, बहुतेक सरकारी व खासगी कर्मचारी आपले कार्यालयीन काम घरामध्ये बसून करत आहेत.
अशा परिस्थितीत, ते दिवसात जास्तीत जास्त वेळ इंटरनेटचा वापर करतात. आजकाल सायबर गुन्हेगारही याचा गैरफायदा घेत आहेत. यात बँकेच्या फसवणूकीचे प्रकार सतत वाढत आहेत. म्हणूनच, सुरक्षेकडे लक्ष देणे फार महत्वाचे झाले आहे. सायबर गुन्हेगार ज्या पद्धतींचा वापर करतात त्यापैकी एक म्हणजे बनावट बँकिंग ऍप्स.
बनावट बँकिंग ऍप्स बेकायदेशीर आहेत आणि ते खऱ्या अॅप्ससारखे दिसू शकतात. यामध्ये मालवेयर असतात, ज्याचा हेतू बँक तपशील किंवा संवेदनशील डेटा चोरणे हा असतो. हे सहसा ऑनलाईन उपलब्ध असतात. सायबर गुन्हेगार त्यांच्यामध्ये तत्सम इमेज आणि आयकॉनचा वापर करतात.
बनावट बँकिंग अॅप कसे ओळखावे? :-
बनावट अॅपचा काय परिणाम होतो? :- मोबाईल मालवेयर केवळ माहितीच चोरणार नाही, तर मोबाइलच्या कामगिरीवरही काबू मिळविते.
एकदा युजर्सने या अॅप्समध्ये प्रवेश केल्यास ते त्यांच्या खात्याची माहिती अनावधानाने त्यात देतात. हे ऍप्स आपला पासवर्ड , सर्टिफिकेट इत्यादी चोरी करू शकते.
ई-मेल स्क्रीनशॉट घेतले जाऊ शकतात. एसएमएस फॉरवर्ड, कॉल ब्लॉकिंग, बॅटरी लाइफ कमी करणे इत्यादी देखील प्रभावित होतात.
योग्य अॅप डाउनलोड कसे करावे? :-