अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव व शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन त्वरित अटक करावी व डॉ. अजित नवले यांना ताबडतोब संरक्षण देण्यात यावे,
या मागणीचे निवेदन छात्रभारती संघटनेकडून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यासाठी अकोले पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांच्यामार्फत देण्यात आले.
निवेदनावर छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, विशाल शिंदे, गणेश जोंधळे, निखिल देशमुख, वैष्णवी कर्णिक यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले आहे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील शेतकरी नेते काॅम्रेड अजित नवले यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्यांना ताबडतोब अटक करावी.
सद्यस्थितीत देशभरातून सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनात कॉ. डॉ. अजित नवले हे महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात सक्रीय आहेत.