अहमदनगर :- तिसर्या फेरीनंतर डॉ. सुजय विखे यांनी ३७ हजार २४२ मतांनी आघाडी घेतली.तिस-या फेरीअखेर डॉ. सुजय विखे यांना ८८ हजार २६४ तर आमदार संग्राम जगताप यांना ५१ हजार २२ एवढी मते .
नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे सातत्याने आघाडीवर असून पहिल्या आणि दुसर्या फेरीत सुजय विखे यांनी २२ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
डॉ. सुजय विखे यांना दुसर्या फेरीत 58022 मते तर आ.संग्राम जगताप यांना 33857 मते मिळाली आहेत.
पहिल्या फेरीनंतर १२ हजार मतांनी भाजपचे डॉ.सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती त्यांना २९ हजार ६९४ मतं मिळाली असून संग्राम जगताप १७ हजार ३४८ मतं पडली आहेत.
निकाल जाहीर होण्या आधीच भाजपची जल्लोषाची तयारी !
निकाल हाती येण्या आधीच भाजप कडून विजयाचा दावा
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जल्लोषाची तयारी
शहरातील गांधी मैदान येथील भाजप कार्यालयावर आकर्षक रोषणाई
37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 18 लाख 54 हजार 248 आहेत यापैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी मतदान केले आहे. नगर मतदारसंघातील मतदानाची 64.26 टक्केवारी आहे.
शेवगाव मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26,
राहुरी मतदान केंद्र 308 मतमोजणी फे-या 22,
पारनेर मतदान केंद्र 365 मतमोजणी फे-या 26,
अहमदनगर मतदान केंद्र 292 मतमोजणी फे-या 21,
श्रीगोंदा मतदान केंद्र 345 मतमोजणी फे-या 25
व कर्जत-जामखेड मतदान केंद्र 355 मतमोजणी फे-या 26)