डॉ. विखे म्हणाले कोरोना महामारीचा शेवटचा प्रवास सुरू…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- कोरोना महामारीचा शेवटाचा प्रवास आता सुरू झाला आहे. कोविड लसीकरण मोहीम हे यातील एक सकारात्मक पाऊल आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्वात मोठे लसीकरण प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात सुरू झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली. प्रवरा मेडिकल ट्रस्ट,

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग यांच्या वतीने कोविड योद्ध्यांसाठी आयोजीत लसीकरण मोहीमेस काल प्रारंभ झाला.

यावेळी डॉ. विखे बोलत होते. याप्रसंगी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. रवींद्र कारले, डॉ. राहुल कुंकुलोळ आदी उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील यांनी कोरोना चाचणी, कोविड रुग्णालय, कोरोनासंदर्भात जनजागृती, आत्याधुनिक आयसीयू अशा प्रकारच्या सेवा जिल्ह्यात कोरोना संकट काळात उभारण्यात प्रवरा मेडिकल ट्रस्ट अग्रेसर राहिले आहे, असे नमूद केले.

याकाळात कोविड रुग्णांच्या उपचारात सर्वाधिक कमी डेथ रेशो राज्यात आपल्या कोविड रुग्णालयाचा राहिला असल्याचेही त्यांनी सांगितले. याला कारण म्हणजे डॉक्टरांनी केले काम.

१२०० पेक्षा जास्त नागरिकांना या कोविड रुग्णालयाची कोविड संसर्गाच्या आजारातून मुक्त होण्यास मदत झाली. सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी कोविड चाचणीच्या सेवेचा लाभ या रुग्णालयातील लॅबच्या माध्यामातून घेतला.

आता वेळ आली आहे या साथीच्या आजारातून आपण अधिक सकारात्मकपणे बाहेर पडण्याची. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे लसीकरण आपल्या कॅम्पसमध्ये होत आहे, असे ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24