अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नालासोपारा : वसई पूर्वेकडील शालीमार हॉटेल समोरील विठ्ठल मंदिराजवळ एका मद्यपी ट्रक चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे १ जण जागीच ठार झाला, तर अन्य ४ जण जखमी झाल्याची घटना घडली.
वालीव परिसरातील फळ विक्रेते आणि काही मजूर आपले काम आटोपून रात्री ११.३० वाजता आपापल्या घरी निघाले होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने तीन जणांना जोरदार धडक दिली.
त्यात एका फळविक्रेत्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याच्या पाठलाग करून फादरवाडी येथे पकडून त्याची धुलाई केली.