महाराष्ट्र

सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे भाज्या देखील झाल्या महाग….! इंधनासाठी लागल्या दूरवर वाहनांच्या रांगा

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याला विरोध म्हणून संपात सहभागी झालेल्या ट्रकचालकांनी शेतमाल भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरात भाज्यांच्या पुरवठ्याला खीळ बसणार आहे.

परिणामी, भाज्यांचा तुटवडा होऊन त्या अधिक महाग होण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. एकट्या वाशीतील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये रोज साडेपाचशे ते सहाशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होते.

नव्या फौजदारी कायद्यात हिट अँड रन प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद केल्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक, टँकरसह व्यावसायिक वाहनचालकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने या कायद्याचा विरोध करत चक्काजामची हाक दिली असून

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक राज्यांमध्ये ट्रकचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे बहुतांशी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या आंदोलनाचा फटका बसला आहे.

Ahmednagarlive24 Office