महाराष्ट्र

Milk Price : दुधाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र फिरवणारा दुग्ध व्यवसाय मोठ्या अडचणीत !

Published by
Ahmednagarlive24 Office

Milk Price : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावात मोठी कपात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले असून, ३८ ते ४० रुपये लिटर प्रमाणे विकले जाणारे

दूध आज केवळ २५ ते २६ रुपये लिटरप्रमाणे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, शेतकऱ्यांचे अर्थचक्र फिरवणारा दुग्ध व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे.

यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना दूधधंदा करणे सध्या मोठी तारेवरची कसरत ठरत असतानाच दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी कमी झाले. एकीकडे दुधाचे भाव कमी झाले मात्र पशुखाद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने दूध व्यवसाय तोटयात जात आहे.

दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या आधार मिळतो तसेच बाजार पठेत त्याची आर्थिक पत निर्माण होते. बी, बियाणे खरेदी करण्यासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी दूध उत्पादक संस्थेकडून अडव्हान्स मिळतो;

परंतु दुधालाच भाव मिळाला नाही तर दूध उत्पादक संस्थांना शेतकऱ्याची गरज भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन व्यवसाय महत्त्वाचा असून, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता चाऱ्याचे व पशुखाद्यचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्या तुलनेत दुधाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही दुधाला भाव मिळाला पाहिजे. पुरुषोत्तम आठरे, चेअरमन, पुरुषोत्तम डेरी मिल्क पारेवाडी.

शेतकऱ्यांना गाई-म्हशी सांभाळण्यासाठी दररोज लागणारा खर्च, औषधांच्या व पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता शेतकऱ्याची मजुरीदेखील या सध्याच्या दूध भावातून मिळत नाही. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दुधाला जास्तीत जास्त भाव दिला पाहिजे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Milk price