अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली असतानाही नगर शहर विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना प्रवेशाची चर्चा घडवून नंतर
राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याच्या निर्णयामुळे चर्चेत राहिलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांचा मंत्रिपद मिळाले नसल्याचे बोलले जात आहे.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्यास दक्षिणेतून राष्ट्रवादीकडून कोणीही उत्सुक नव्हते. अशा वेळी संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला होता.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
यावेळी त्यांना निवडणुकीची तयारी व प्रचाराला कमी वेळ मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. पण नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी निश्चित असतानाही त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
पण शिवसेनेने माजी आमदार अनिल राठोड यांची उमेदवारी निश्चित केल्यावर जगतापांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली व जिद्दीने प्रचार करीत सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
यामुळेच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण धरसोड वृत्ती मुळे मंत्रिपदाची हुलकावणी देऊन गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शहरातील त्यांचे समर्थक निराश झाले आहेत.