या कारणामुळे झाली त्या सुपरवायझरची कोयत्याने वार करून हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-एमआयडीसीतील क्रॉम्टन कंपनीतील सुपरवाझरची रखवालदाराने कोत्याने वार करून केलेल्या हत्येने कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

राजाराम नामदेव वाघमारे (वय ४८, रा. भिंगार) यांची हत्या झाली आहे. राहुरीतील किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा) याने ही हत्या केल्याचे पुढे येत आहे.

हे पण वाचा :- ‘लोकनेते’ हे पद विखे पाटील परिवारासाठी इतर पदापेक्षा सर्वात मोठे – खा. सुजय विखे पाटील

त्याने ही हत्या ऊस तोडणीच्या कोयत्याने केली आहे.या हत्यामागे सुपरवायझर आणि रखवालदार यांच्यातील नोकरीतील वाद असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …

हत्यारा किरण लोमटे हा पसार असून त्याचा एमआयडीसी पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सुपरवाझर वाघमारे यांनी लोमटे याला रखवालीचे काम वाटून दिले होते. या कामावरून लोमटे हा कुचराई करत होता.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : नालायक शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली सेक्सची मागणी !

त्यातून वाघमारे आणि लोमटे यांच्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. त्यातूनच ही हत्या झाल्याचे पोलिसांचे प्राथमिक म्हणणे आले आहे.

हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार

लोमटे याच्या शोधासाठी एमआयडीसी पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील कार्यरत झाले आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24