आ. रोहित पवारांतर्फे मतदारसंघात पाच मालट्रक धान्य !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :-  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अल्पकालावधीसाठी स्थलांतरीत झालेल्या व निराधार, मजुर, हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार यांनी दिलासा दिला आहे.

त्यांच्याकडून रविवारी पाच ट्रक धान्य कर्जत येथे पोहोच करण्यात आले आहे. मतदारसंघातील हजारो गरजू लोकांना गहू व डाळ असे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे पोहोच करण्यात आले आहे.

ज्यांना आवश्यता आहे अशा लोकांना प्रशासनाच्या माध्यमातुन हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लोकं आहे त्या ठिकाणी अडकून पडले आहेत.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणेही शक्य नाही त्यामुळे जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले धान्य उपलब्ध होणे कठीण होऊन बसले आहे.

उपलब्ध झालेच तरी सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत धान्य विकत घेणे व बाहेरून आणणे सहजशक्य नसल्याने अशावेळी आमदार पवार यांच्या माध्यमातून घरपोच होणाऱ्या या धान्यामुळे हजारो गरजूना दिलासा मिळणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24