अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई :– परिवहन विभागात सहायक मोटर वाहन निरीक्षकाकडे तब्बल 1 कोटी 71 लाख रुपयांची बेहिशोबी संपत्ती सापडली आहे.
तीन वर्षांपासून प्रादेशिक परिवहन विभागात काम करणाऱ्या या अधिकाऱ्याला गेल्या वर्षी लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
मिथुन रामेश्वर डोंगरे असं संबंधित अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या मुंबईत कार्यरत असणाऱ्या डोंगरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विबागाने कारवाई केली होती.
२४ एप्रिल २०१८ ला वाहन परवाना देण्यासाठी मिथुन डोंगरे यांनी दलाल मुकेश रामटेके यांच्या मदतीने दोन हजारांची लाच घेतली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिथुन डोंगरे व दलाल मुकेश रामटेके या दोघांना अटक केली होती. या दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीच्या पथकाने त्यांच्या काटोल येथील निवासस्थानाची झडती घेतली. झडतीदरम्यान १ कोटी, ७१ लाख रुपयांच्या मालमत्तेचे दस्तऐवज एसीबीला आढळले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डोंगरे यांची उघड चौकशी सुरू केली.
आरटीओमध्ये तीन वर्षांपूर्वी नोकरीला लागलेल्या मिथुन डोंगरे यांचे याआधी शिकाऊ वाहन परवाना घोटाळ्यातही नाव आले होते. आर्थिक गुन्हे शाखेनं डोंगरे यांच्यासह 17 आरटीओ अधिकारी आणि दलालांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.