अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने तांडव सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊस होऊन अनेक ठिकाणच्या भुयारी पुलाखाली पाणी साचत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे.
याचाच प्रत्यय चितळी येथील रेल्वेच्या भुयारी पुलाच्या येथे आला आहे. राहाता-श्रीरामपूर रस्त्यावरील चितळी येथे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक बंद झाली आहे.
मागील तीन महिन्यांपूर्वी भुयारी पुलाखालील पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करू असे खा. सदाशिव लोखंडे यांना रेल्वे अधिकार्यांनी आश्वासन दिले होते.
परंतु या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सदर भुयारी पुलाखाली पाणी साचून वाहतूक बंद पडली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून रेल्वे विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले होते.
त्यावेळी खास बाब म्हणून चितळी येथील रेल्वे भुयारी पुलाखाली साचणार्या पाण्याची जमिनीखाली पाईपलाईन टाकून ‘झिरो पॉईंट’ पर्यंत व्यवस्था करू,
असे आश्वासन रेल्वे विभागाचे अ.नगर येथील व्यवस्थापक आशिष शाहू यांनी दिले होते. त्यानंतर तीन महिने उलटले तरी रेल्वेकडून कार्यवाही झाली नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved