खा. सुजय विखेंची खडसेंच्या पक्षांतराबद्दल सावध प्रतिक्रिया ; म्हणाले …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे.

त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नसल्याचे बोलले जात असले तरी पक्षाला नक्कीच याचा तोटा होईल असे पक्षांतर्गत गुप्तपणे चर्चाही ऐकायला मिळत आहे.

अशातच खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यांच्या पक्षांतराबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे. याबात खा. सुजय विखे यांनीही याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते होते. मी भाजपमध्ये नव्हतो, त्या आधीपासून ते पक्षात होते. ते गेल्यामुळे पक्षाला निश्चितच नुकसान होणार आहे. पण तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे.

मी पक्षात नवीन आहे. मला एकच वर्ष झाले. त्यामुळे एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती ४० वर्षे पक्षात राहिलेल्या व्यक्तीवर टीकाटिपण्णी काय करणार,’ असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24