एकनाथ खडसेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असता त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांचे मुंबईत आल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट नेगेटिव्ह आले.

त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी १० वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

‘मला कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये’, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24