Electric Scooter : देशात दिवसोंदिवस इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मागणीत वाढ होत आहे. अशा वेळी ओला इलेक्ट्रिक स्कूटर लोक सर्वाधिक खरेदी करत आहेत. ओलाचे उत्कृष्ट मायलेज आणि आकर्षक डिझाईन या स्कूटरला खूपच वेगळे बनवते.
मात्र आता ओला इलेक्ट्रिकचे टेन्शन वाढणार आहे. कारण नुकतीच फुजियामा कंपनीने आपली परवडणारी स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
नवीन कंपनीच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जपानची इलेक्ट्रिक स्कूटी निर्माता फुजियामा कंपनीने भारतात एकाच वेळी 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी ते प्रत्येक बजेटच्या लोकांसाठी तयार केले आहे. स्कूटर्स हाय स्पीड आणि लो स्पीड कॅटेगरीमध्ये विभागल्या जातात.
किंमत 49,499 रुपये एक्स-शोरूम पासून सुरू होत आहे…
लो स्पीड स्कूटरमध्ये 4 मॉडेल उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात स्पेक्ट्रा प्रो, स्पेक्ट्रा, वेस्पर, थंडर या मॉडेल्सचा समावेश आहे. आणि हाय-स्पीड रेंजमध्ये Ozone+ मॉडेलचा समावेश आहे.
या स्कूटरच्या किमतीच्या श्रेणीबद्दल बोलायचे झाले तर, ते 49,499 रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते आणि 99,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
या स्कूटरची रेंज 140 किमी आहे. यामध्ये उच्च क्षमतेची लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ते पूर्ण चार्जमध्ये फक्त 2-3 युनिट वीज वापरते. फुजियामा या इलेक्ट्रिक स्कूटरसह पहिल्या तीन सेवा मोफत देत आहे.
त्यानंतर स्कूटरच्या सर्व्हिसिंगचा खर्च 249 रुपये होईल. त्यामुळे जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.